image
आमच्या विषयी

आता तुमचे आवडते कोर्सेस शिका आपल्या मराठी भाषेत ..

उपलब्ध कोर्सेस
image
www.onlineshikuya.com
घरबसल्या 
शिकूया 
सर्वकाही 
About
नमस्कार, www.onlineshikuya.com या वेबसाईटवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. onlineshikuya.com हि वेबसाईट  Prosper Web Pvt. Ltd  यांच्याशी संलग्न असून गेल्या पाच वर्षांपासून लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये कार्यरत आहे.
Prosper Web Pvt. Ltd च्या माध्यमातून आम्ही यापूर्वी अनेक ऑफलाईन कोर्सेस, वर्कशॉप्स घेतले असून, त्याचा हजारो विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाला. हे कोर्सेस घेत असताना आमच्या लक्षात आले की या वर्कशॉपला किंवा ऑफलाईन कोर्सेसला सगळ्यांनाच वेळ देता येणे शक्य होत नाही. जर हेच कोर्सेस आपण ऑनलाइन रेकॉर्डेड स्वरुपात घेतले तर, त्याची किंमतही कमी ठेवता येईल आणि आपल्या मराठी बांधवांना सहजपणे घरबसल्या हे कोर्सेस त्यांच्या वेळेत शिकता येईल.
         म्हणूनच आम्ही  www.onlineshikuya.com या वेबसाईटची निर्मिती केली असून वेबसाईटच्या माध्यमातून पुढील 2 वर्षांत शेकडो महत्वाचे कोर्सेस  ऑनलाइन स्वरुपात आपल्या मराठी बांधवांसाठी उपलब्ध करून दिले जातील. मग त्यात शैक्षणिक, छंद, चित्रपट, भाषा, व्यवसाय, संगणक, संगणकीय भाषा, व्यक्तिमत्व विकास, मार्केटिंग, स्वास्थ्य, कला असे अनेक विभाग समाविष्ट असतील.
आजही इंटरनेटच्या मायाजालात विविध प्रकारचे कोर्सेस आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच ज्या इतर भाषांमध्ये कोर्सेस उपलब्ध आहे त्यांच्या हि प्रचंड किंमती आहेत. मात्र www.onlineshikuya.com च्या माध्यमातून आपण सर्वांना परवडेल अशा किंमतीत तसेच दर्जेदार गुणवत्ता व अनुभव असलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून विविध कोर्सेस आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. आपण सर्वांनी नक्की या कोर्सेसचा लाभ घ्या तसेच आपले  मित्र – मैत्रिणी, नातेवाईक यांना ही याचा लाभ करून द्या. धन्यवाद !  


15Courses
2025Active Students
;